खूप जुनी गोष्ट आहे. भारतवर्ष नावाच्या देशाखाली. तिथे खूप राजे होते, राण्या होत्या, सरदार होते, दरकदार होते. तसेच अलबते गलबतेही होते. राजे-महाराजे लहरी होते. चैनी होते आणि ते खूप स्वार्थी ही-त्यामुळे काही अपवाद वगळता आपल्या प्रजेची काळजी करीत नसत.
माणसे बिचारी हलाखीत, दु:खात, गरिबीतही कशीबशी जगात असत. अखेर अती झालं आणि सगळेच खवळून उठले-त्यांनी साऱ्या राजांना मोडीत काढले. त्यांनी तिथं आपलं स्वत:चे लोकराज्य स्थापन केलं. म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी स्थापलेलं राज्य..
आता आपण सुखी होणार. आपल्या हालअपेष्टा संपणार, हम करे सो कायदा होणार नाही, लहरी कारभार थांबणार असं साऱ्यानां वाटलं.
दु:ख भरे दिन बीते रे भैया,
सुख भरे दिन आयो रे,
असेच जो तो एकमेकांना सांगू लागला.
लोकराज्यात सारे लोक एकदम थोडेच राज्य करणार होते? लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिले होते आणि तेच शासन चालविणार होते.
पण तिथे मोठीच गोची होती. प्रत्येकालाच लोकप्रतिनिधी होऊन लोकसेवेची हौस होती. काही लोकराज्य आणण्यासाठी आपलेच प्रयत्न कारण असल्यामुळे आता आपल्यालाच लोकसेवेची संधी मिळावी. कुणी म्हणाले राज्य चालविणे काय पोरखेळ! आम्ही पिढ्यानपिढ्या राज्य चालवलं. आम्ही आमच्या अनुभवाचा तुम्हाला देऊ. काहींनी आजवर आपल्याला कधीच काही मिळालं नाही, म्हणून आपल्याला संधी देण्याची मागणी केली.
पण जनतेने आपल्या शाहणपणाच्या कसोटीवर उतरतील असे प्रतिनिधी निवडले. मग त्यात काही खरे आले, खोटे आले, लहान आले मोठे आले. हौसे आले तसे गवसे आलेच.
दिवस सरत होते. लोक प्रतिनिधी काही नवी काही जुने, असे निवडून येत जात होते. लोक गरीब होते अशिक्षित होते. अशिक्षित असले तरी शहाणे होते. अनुभवी होते.
लोकांच्या प्रतिनिधींनी कारभार सुरु केला. प्रतिनिधी वेगवेगळ्या भागातले होते. कुणी तांबड्या झेंड्याखाली होते, तर कुणी हिरव्या, कुणी निळ्या, कुणी रंगीबेरंगी पण-लोकांची सेवा- हा एकच वसा त्यांनी घेतला होता.
एकदा प्रतिनिधी निवडले, दोनदा चारदाही निवडले. पण आपला चिखलात रुतलेला गाडा काही वर निघत नाही पाहून एकदा एका दुसऱ्यांदा दुसऱ्या टोळीतले निवडून पहिले. पण काय...जगन्नाथाचा रथ आपला तिथेच. असे का होते त्यांना कळेना. काय करावे सुचेना.
इकडं प्रतिनिधी निवडून आले. त्यांनी कारभार सुरु केला. जस जसे दिवस जाऊ लागले तसे त्यांना ध्यानात अनेक गोष्टी येऊ लागल्या. कारण सारेच प्रतिनिधी काही सारखेच नव्हते. अनेकजण जनतेला मामा बनवून आले होते. काही उपाशी होते, तर काही आधाशी.
सार्यांच्या ध्यानात आलं होतं कि हा अमाप फायद्याचा बिनभांडवली धंदा छान आहे. याला न शिक्षणाची गरज, ना कसल्या लायकीची. फक्त लोकांना मामा बनविण्याची कला हवी.
तशा प्रतिनिधींच्या अनेक टोळ्या होत्या. वेगवेगळे झेंडे होते. लोकांसमोर भांडत. एकमेकात ईर्षा होतीच आणि आपण करतो ते लोकांच्या कल्याणाचेच असा भाव आणीत.
पण सारे बाहेरूनच. आतून सारे एकच. थोडक्यात काय... तू मी भाऊ, जाऊ तिथे मिळून खाऊ. पण हे नेहेमीच कसे साधणार? कसं काय साधणार? आपली गरज आणि आपली किमंत त्यांना कशी काय राहणार?
त्यांना हवी ती सुखसमृद्धी मिळाली तर आपण गेलोच कि बाराच्या भावात. तेंव्हा लोकांना सतत गरजवंत ठेवायचे. एक प्रश्न सोडवत असताना दुसऱ्या प्रश्नाची पाचर मारून ठेवायची. खऱ्याखोट्या गरजा निर्माण करून त्यांना गरजवंत बनवायचं. त्यांचच घेऊन त्यांना देताना दात्याचा आव आणायचा. थोडक्यात ते भिकारी आणि आपण दाता असं नातं निर्माण करायचं. आणि असं उरफाट नातं निर्माण केलं.
आता पिढ्यानपिढ्या गेल्या तरी या वेगळ्या झेंड्याखालच्या वेगळ्या टोळ्या लोकसेवेचा वसा त्यांची मुले, नातवंडे, पंतवंडे त्यांचा लोकसेवेचा चालवत आहेतच. लोकसेवेचा तो वसा चालवायला तयार आहेतच. दाता आणि भिकाऱ्याचं नातं तसंच, प्रश्नही तसेच.

देव दयाळू, कृपाळू, मायाळू, कनवाळू असतो परंतू ब–याच वेळा तो झोपाळू असतो००
ReplyDeleteहाहा....ही प्राचीन परंपरा आहे....."हम करे सो कायदा" और "सिर्फ हमारा फायदा" असेच राजकारण समाज कारण या पृथ्वीतलावर असेल याची अनुभूती या लेखाद्वारे आपण करून दिलीत याबद्दल धन्यवाद दळवी सर !!! आशा आहे असेच लिखाण आपण आम्हा रसिकां पर्यंत पोहोचवत जाल...!!!
ReplyDelete• निर्बल की लड़ाई बलवान से, ये कहानी है दिये की और तुफान की •
ReplyDeleteपूर्व इतिहास व वास्तवाचे वर्णन आपण तंतोतंत केले आहे. पिध्यानु पिढ्या चालणारे राजकारण आता थांबवायलाच हवे! समाजाचा सर्वांगीण विकास कोणत्याच पक्षाला नको आहे. समाज विकसित झालं तर पुढार्यांना उपवास घडेल ना! जनताजनार्दनाने आता मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे! तेव्हाच या भावू-भाऊ चे संपेल खाणे व जनता सुराज्याचे गावू लागेल गाणे!
ReplyDeleteआपल्या इथे भाऊ भाऊ असे काही नसते. मूड बदलला की एक कुटुंब म्हणून सगळीकडे मिरवणारे दूसर्या दिवशी विश्वासघात करून ग्रुपमधून हाकलून देतात. साधी माणसे जर का अशी वागतात, तर राज्काराण्यांविषयी काय बोलायचे ?
ReplyDeleteह्यालाच म्हणायचं का लोकराज्य?
ReplyDeleteजिथे इमानदारी आहे अगदी वर्ज्य,
विसरुनी पापपुण्य अन नितीमुल्ये पूज्य,
आव आणिती जणु तेच घडविती स्वराज्य.
आयलाऽ अभी लेखक झाऽऽऽऽऽऽऽला !
ReplyDeleteआहो राम भाऊ, लेखणी श्री. शरद दळवींची... माझी नाही... कथेचे वाचन केले आणि शेर केली....
ReplyDeleteहाहाहा @ राम भाऊ ....
ReplyDeleteअभी आणि लेखक हंsssssss खरे तर त्याने लिहायला हवे ....श्री.शरद दळवी सरांसारखे ....काय अभी ट्राय कर ...
मात्रभाषेचा अभिमान आहे पण शब्दांची बेरीज म्हणाली ki 'त त फ फ' होते...
ReplyDeleteमित्रहो तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या. आणि वाटलं भारताची तरुणाई इतकी विचारी आणि प्रगल्भ असेल तर "मेरा भारत महान" हे निश्चितच वास्तवात येईल... माझी लेखणी ही परत तरुण झाली.
ReplyDeleteशशांक, स्वाती, मिलिंद, मंगला वगैरेनी काव्यात किंवा मोजक्या शब्दात दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या मार्मिक आकलनाची साक्ष देतात.
तीन चार दिवसात शेकड्यांनी आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे तर जणू पूर्व संचिताचे फळ.
धन्यवाद, आभार वगैरे मैत्रीच्या कोषात नसतात. त्या ऐवजी गोव्याच्या कोकणी भाषेत म्हणतो...'देव बरें कोरुं'.
Baba Sher tar aapan Pavsher tari aahotach ki .Khup chan.
ReplyDelete