फार फार जुनी गोष्ट. त्या काळी तिन्ही लोंकांवर राज्य करणारा एक राजा होता. त्याचं नाव मनु. फार चांगला. प्रजेवर प्रेम करणारा. पण दिवस गतीनं तो म्हातारा होऊ लागला. तेंव्हा त्यानं आपलं राज्य तीन मुलांत वाटून दिलं. मुलांची नावं होती, देव, दानव आणि मानव.
तिघेही वर्षातून एकदा दसऱ्याला बापाला भेटायला जात. एकमेकांची विचारपूस करत.
एकदा अशा भेटीच्या वेळी धाकट्या मुलानं बापाकडे हट्ट घेतला कि बापाने त्याला काही चांगला उपदेश द्यावा. इतरांनीही तोच आग्रह धरला.
मग बापाने त्यांपैकी एकेकाला जवळ बोलावले व कानात काही सांगितले. तिघांनीही ते ऐकून समाधानाने मान डोलावली व ते आपापल्या राज्याकडे निघाले.
हिमालयाच्या पायथ्याशी एके ठिकाणी त्यांच्या राज्याला जाण्यासाठी तीन रस्ते फुटत होते. तिथे आल्यावर तिघेही तिथे थांबले. प्रत्येकाच्या मनात कुतूहल होते कि दुसऱ्याला काय सांगितले असेल?
त्यांनी एकमेकांना विचारले. पण आधी तू आधी तू असं म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. मग शपथेवर कबूल करून सांगून टाकले. पण तिघेही आधी चकित झाले. कारण तिघांना फक्त एका अक्षराचाच उपदेश राजा मनुने केला होता, 'द'.
पण आपले 'द' वेगळे असा प्रत्येकाचा हट्ट होता. अखेर प्रत्येकाने आपल्या 'द' चे स्पष्टीकरण द्यायचे ठरवले.
देव म्हणाले, आम्ही फार भोगवादी आहोत. ख्याली खुशाली आणि चैनीत गुंग राहतो. तेंव्हा बाबांनी आम्हाला बाबांनी आम्हाला 'द' म्हणजे दमन करायला, संयम पाळायला सांगितले आहे.
दानवांनी खुलासा केला, आम्ही शक्तिमान आहोत तसे रागीटही. कधी कधी आमचा राग आम्हाला क्रूर बनवतो. तेंव्हा 'द' म्हणजे 'दया' करावी असेच त्यांनी आम्हाला सांगितले.
मग मानावांनीही लाजत लाजत आपल्या 'द' चा अर्थ सांगितला.
ते म्हणाले कि, आम्ही माणसं खूप स्वार्थी आहोत ना ! त्यामुळे बाबांनी आम्हाला त्यागाचा, स्वार्थ त्यागाचा उपदेश दिलाय. आमचं 'द' म्हणजे 'दान'. दुसऱ्यांचा विचार आधी करावा ही त्यांची शिकवण आहे.
हे सांगून तिघेही आपापल्या जागी गेले.
यानंतर दिवस गेले, वर्षे गेली, दशकेही गेली. माणूस होता साऱ्या सृष्टीत सर्वांत दुबळा. त्यांच्या शक्तीला खूप खूप मर्यादा होत्या. पण तो मोठा जिद्दी आणि प्रयत्नवादी होता. मग त्यानं आपल्या बुद्धीचा वापर केला. खूप कष्ट केले. पंचमहाभूतांवर विजय मिळवले. देव आणि दानवांची निर्मिती आणि विनाशाची शक्ती देखील त्यानं मिळवली.
मानव आपल्यापुढं गेल्याचं बघून देव आणि दानव हताश झाले. आता काय करावं बरं? मग त्यांना युक्ती सुचली. तेच सारे मानवांत मिसळून गेले.
त्यांच्या या युक्तीमुळे माणूस जो आधी फक्त स्वार्थी होता तो चैनी, भोगवादी, रागीट आणि क्रूरही बनला. यामुळं एकीकडे मुंग्यांना साखर घालू लागला तर दुसरीकडे माणसांच्या अन्नात आणि औषधांत भेसळ करू लागला. गोरगरीब भिकारी वगैरेना चार पैसे दान करू लागला तसाच काळाबाजार आणि भ्रष्टाचारही करू लागला. एकीकडे नवनव्या देवांची अन् मंदिरांची उभारणी करू लागला. दुसरीकडे विनाशकारी युद्धे घडवून आणू लागला. दानाचा उपदेश मात्र तो पाळत असे.
बिचारा मनुराजा मात्र हिमालयातील कैलासावरून कपाळाला हात लावून भकास डोळ्यांनी मानवाची ही करणी पाहत राहिला.

देव भोगवादी असावेत , त्यामुळेच माणूसही भोगवादात बुडत चालला असावा !
ReplyDeleteवाह! खूपच अर्थपूर्ण व बोधपूर्ण अप्रतिम कथा! सुष्ट व दुष्ट या प्रवृत्ती आहेत. या माणसातच असतात. दुष्ट प्रवृत्ती म्हणजे माणसातील राक्षस व सुष्ट म्हणजे देव! बुद्धिवादी माणूस आपल्यातील ज्या गोष्टींची प्रबलता वाढवतो त्या प्रमाणे तो गणला जातो! शुभदिन!
ReplyDeleteदेव ही एक संकल्पना आहे. देवाचे असणे किंवा नसणे ही वैयक्तिक बाब आहे. आपल्यापेक्षा मोठी ताकद या जगात आहे कि जी आपल्याला आनंद, विश्वास आणि निर्भयता देते ती म्हणजे देव. कालानुरूप देवाची व्याख्या बदलत असते. जुन्या काळात, देव आणि दानव अथवा राक्षस यांची अस्तित्व मानले जायचे. आताच्या काळात आपल्याला जो मदत करतो, संकटातून सोडवतो तो देव तद्वत जो त्रास देतो तो राक्षस..
ReplyDeleteमानवी प्रवृत्ती ही चैन आणि भोगवादी कशी बनली याची कल्पना खूप सुंदर वाटली सर .....
ReplyDelete'द' म्हणजे 'दान'
'द' म्हणजे ' दमन'
'द' चा 'ध' झाला... "म" नाही म्हणायचे......:-))))
मानव चांगली आणि वाईट दोन्ही कृत्ये करत आपले जीवन जगतो आखिर ....
Very creative but says a lot abt our life as "Manav" now. We need more advice with a different letter in place of "da". May not be by Manu. "Dusaryancha vichar " we have forgotten.We have to invent new Manu!
ReplyDeleteजन्मताना जन्मतो आपण साधे सुधे
ReplyDeleteजगताना जगतो कधी देवा तर कधी दानवा सारखे
जाताना मात्र एक लक्षात गोष्ट येते
मानव म्हणून जन्मलो होतो
आणि माणूस म्हणून जगायचो राहिलो
आज आपल्या देहात देव दानव मानव तिन्ही रूपे आहेत आणि आपण तिन्ही "द" चा उपयोग करतो पण आता फरक इतकाच आहे कि आपण तिन्ही "द" उपयोग अगदी उलट करतो
भ्रष्टाचारावर आपण दमन म्हणजे संयम बाळगतो
गुंडगिरी,कालचे चोर गुंड आजचे नेते त्यांच्यावर आपण दया दाखवतो
आणि दान आपण करतोच पण ते केलेलं दान खऱ्या दात्याकडे पोहचते कि नाही हे माहीतच पडत नाही
शिरली आहेत रूपे आता या एकाच देहात
दमन दया दान करतो आम्ही मस्त जोरात
फरक इतुकाच कि आपले उलट आहे सगळ्यात
देव बदलला, दानव बदलला, मानव बदलला
ReplyDeleteअर्थाचा अनर्थ झाला, जो तो सोयीस्कर रित्या वापरू लागला
म्हणून मनूचा "द" बदलला, आणि माणूस हरवला
"द" चा दगड झाला...........
ReplyDeleteOne of "the" best...
ReplyDeleteप्रत्यक्ष निर्मात्यालाही हताश करणारी आपली जमात ......सगळे द अनुभवून शेवटी दहनातला द ज्यांच्याकडे उरतो ......असे आपण .....!!!!.......देव दानवा नरे निर्मिले हे मत लोक कवळूद्या ...काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर उसळू द्या .....हेच खरं.....!!!!
ReplyDeleteमाणसातला "म" म्हणजे माणसाचे मन.
ReplyDeleteपण आज हा मन हरवलेला माणूस
म्हणजेच फक्त माणसाच्या देहातला "द" राहिला आहे.
We are not, with our however evolved knowledge and apparatus , capable of causing despair and upturning nature, human being is still too small for that, and the nature too vast for our mind to comprehend.We, with our intellect, can only react within the fragments of time.Whatever we do we cannot escape the movement of nature,which is beyond our notions of rights and wrongs. We cannot escape as we too along with our thoughts are also a part of the same nature, things will undergo a change because that is the part of evolution. Human mind has to change and it will when it goes through its own worst and sees its ghastly side at its fullest and hate it, only then . Without confronting the hell inside us, we cannot construct a heaven outside.The situation today is a part of the metamorphosis, this too will pass and move towards a favorable time Stories such as above are a part of this metamorphosis designed again by nature to face our inner sides and make the much needed change.The author again a part of the design..
ReplyDeleteThanks Mr. Dalvi
ReplyDeleteNice. Thanks Sir!!
ReplyDeleteजिथे चांगले असते तिथे वाईट ही असते...तसेच काहीसे आपल्या मनाचे असते..चांगले आणि वाईट ह्या आपल्याच मनाचे दोन भाग असतात..खरे तर देव आणि दानव हे दोघाही माणसाच्या मनात वास करून असतात..हे त्याचे दुर्दैव की दोन्ही गोष्टी त्याच्या मधे एकाच रुपात सामावल्या गेल्या..म्हणून तो कधी देवा सारखा तर कधी दानवा सारखा वागतो...देवाला आणि दानवाला आपल्यातला "द" कदाचित वेगळं करता आला नाही किवां समजला नाही असे समजूया..म्हणूनच कदाचित त्या दोघांनीही ही मानवाचा आधार घेतला असेल आपल्यातला "द" ओळखण्या साठी....आणि मानव हा साधा भोळा आज ही दोघांना जपतो आहे.....पण दुर्दैव त्याचे ...तो स्वतः संपून गेलं तरी देवाला आणि दानवाला "द" त्यालाही समजला नाही.....
ReplyDeleteProfound.......Thanks a lot for sharing
ReplyDeleteदगडफोड्याची गोष्ट आठवली....
ReplyDeleteSatya Paristhiti....
ReplyDeletenice story
ReplyDeleteabhi ....kya bole ...
ReplyDeleteya tighanpaiki konachya bajula jayach te aapanach tharvayach tyavar aapali pravritti disun yete.
ReplyDeleteSaam, Daam, Dand, Bhed, Kapat hich varnayawadyanchi sanskruti aahe.
ReplyDelete